दर महिन्यात फेशियल केल्याने ५ महत्वाचे फायदे
ब्लॉग नंबर १३.
दर महिन्यात फेशियल केल्याने ५ महत्वाचे फायदे
प्रत्येक महिलांच्या मनात फेशियल ला घेऊन अनेक प्रश्न असतात. दर महिन्यात फेशियल करणे गरजेचे आहे का? ते करावे का, की घरच्या घरीच काही क्रीम लावली तर चालेल का? आम्ही घरातच फेशियल करू शकतो का? अशी एक नाही तर अनेक प्रश्न महिलांच्या मनात येत असतात. त्याचेच उत्तर देण्यासाठी मी हा ब्लॉग लिहित आहे.
मी तुमची मैत्रीण सौ सुनिता शैलेंद्र गायकवाड. स्कीन आणि हेअर एक्सपर्ट. द कंप्लीट स्कीन आणि हेअर ची संस्थापिका. १७ वर्षे ब्युटी या क्षेत्रात कार्यरत आहे. आणि येत्या तीन वर्षात मला 25 हजार मैत्रिणींचे स्किन आणि हेअर चे प्रॉब्लेम दूर करून त्यांना अधिक सुंदर बनवणे हा माझा ध्यास. पुढे मी तुम्हाला दर महिन्यात फेशियल केल्याने काय फायदा होणार आहे हे सांगणार आहे, ते तुम्ही नक्की वाचा.
कित्येक महिला आपल्या त्वचेसाठी खुप महागाच्या क्रीम खरेदी करतात. पण त्याचा हवे तसा रिझल्ट त्यांना मिळत नाही. त्यापेक्षा दर महिन्यात फेशिअल केले तर त्यामुळे स्कीन अधिक सुंदर आणि चमकदार राहू शकते. दर महिन्यात व्यवस्थित फेशिअल केले तर त्यातील फायदे आपल्याला दिसू शकतात.
१. डीप क्लीनझिंग होते.
तुम्ही कोणत्याही प्रकारचे स्क्रब केले, क्रीम लावली, किंवा फेस पॅक युज केला, तरीही फेशिअलने जे डीप क्लीनझिंग होते, तसे इतर काही ही गोष्टी केल्यामुळे होऊ शकत नाही. त्यामुळे फेस वरील छिद्र क्लीन आणि छोटे होतात. पोर्स क्लीन झाले की त्यावर तुम्ही इतर क्रीम लावली की त्याचाही तुमच्या त्वचेवर फायदा होऊ शकतो.
२. ब्लड सर्क्युलेशन चांगले होते.
फेशिअलच्या दरम्यान चेहऱ्यावरील ब्लड सर्कुलेशन मध्ये सुधारणा होते. फेशियल मध्ये स्क्रब आणि मसाज केला जातो. त्यावेळेस चेहऱ्यावरील एक्यूप्रेशर पॉइंट प्रेस केले जातात. त्यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगले होते, त्याचबरोबर चेहऱ्यावरील पिंपल्स कमी व्हायला मदत होते.
३. सुरकुत्या कमी होतात.
चेहरा तरुण दिसायला हवे असेल तर महिन्यातून एकदा फेशियल करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा जाऊन नवीन त्वचा वर येते आणि ब्लड सरकूर्लेशन ही फास्ट होते. नियमित फेशिअल केल्याने, सुरकुत्या कमी व्हायला मदत होते.
४. डाग नाहीसे होतात.
नियमित फेशियल केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग हळूहळू कमी होऊ लागतात. चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी मार्केट मध्ये बऱ्याच प्रकारच्या क्रीम अव्हेलेबल आहे. पण फेशिअल मध्ये अगदी स्टेप बाय स्टेप कृती करून, व्यवस्थित पद्धतीने, तुमच्या चेहऱ्याची स्कीन टाईप ओळखून फेशिअल केले जाते, ते डाग नक्की कसले आहे, ते बघून त्यावर ट्रीटमेन्ट केली जाते. त्यामुळे डाग कमी व्हायला मदत होते.
५. तणाव कमी होतो.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक ताण तणाव पूर्ण जीवन जगत असतात. ह्याचा परिणाम ही आपल्या शरीरावर आणि स्कीन वर होत असतो. फेशिअल मध्ये पॉइंट टु पॉइंट मसाज करून, ॲक्युप्रेसर पॉइंट दाबून मसाज केले जाते. त्यामुळे तणाव कमी होतो.
माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.
तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.
फेसबुक ग्रुपची लिंक मी इथे दिली आहे.

Thank you
उत्तर द्याहटवाखूपच छान मार्गदर्शन केलंत