जाणुन घेऊया स्कीन ब्लिच काय आहे.

 ब्लॉग नंबर १२.

जाणून घेऊया स्कीन ब्लिच काय आहे. 

     स्कीन ब्लिच बद्दल बऱ्याच जणांना बरेच प्रश्न असतात. ब्लिच स्कीन साठी योग्य आहे का? हे नियमित केले गेले पाहिजे का? ह्यामुळे काही साईड इफेक्ट तर होणार नाही ना? असे बरेच प्रश्न आपल्या मनात येत असतात.



      असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आहेत का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन आले आहे,  मी तुमची मैत्रीण सौ. सुनिता शैलेंद्र गायकवाड. स्कीन आणि हेअर एक्सपर्ट द कंप्लीट स्कीन आणि हेअर ची संस्थापिका सतरा वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे. आणि येत्या तीन वर्षात मला 25 हजार मैत्रिणींचे स्किन आणि हेअर चे प्रॉब्लेम दूर करून त्यांना अधिक सुंदर बनवणे हा माझा ध्यास.

     त्वचेला सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी  ब्लीच चा वापर केला जातो. ब्लिचमुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग, काळपटपणा निघून जाऊन चेहऱ्यावर चमक येते. त्याच प्रमाणे चेहऱ्यावरील बारीक लव लपवण्यासाठी ब्लिचचा वापर केला जातो. ब्लिच केल्याने चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते. आणि चेहर्‍यावर उजळपणा येतो. ब्लिच चे बरेच फायदे आहेत. त्याबद्दल बऱ्याच जणांना  माहीत नसते, जर तुम्ही ही ब्लिच चा वापर करत असाल. तर तुम्हाला ही ब्लिच बद्दलची माहिती असणे जरुरी आहे.



     स्किन ब्लीच चेहरा आणि शरीरावरील केसांचा रंग हलका करण्याची एक प्रक्रिया आहे. ब्लिच स्किन टोन मध्ये सुधारणा करते. तरुण मुलं-मुली चेहरा आणि शरीरावरील काळ्या भागावर ब्लिचचा वापर करतात. तसे बघितले गेले तर ब्लीच  चेहऱ्यावरील केस लपविण्याची एक प्रक्रिया आहे. ते तुमचा चेहरा आणि शरीरावर एक डाय च्या स्वरुपात काम करत असते. त्याच बरोबर चेहऱ्यावरील काळे डाग, निशान आणि पिंपल्स चे डाग कमी करण्याचे काम ही ब्लीच मुळे होते. फेशियल च्या आधी ब्लीच चा वापर केला जातो. यामुळे चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका होऊन नंतर फेशियल केल्याने चेहरा चमकदार आणि उजळ दिसतो. 

माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

      हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.

      तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.

फेसबुक ग्रुपची लिंक मी इथे दिली आहे.

Kushal beauty and hair care

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट