फेशिअल करण्याच्या 16 फायदे भाग ३
ब्लॉग नंबर ११.
फेशियल करण्याचे 16 फायदे - भाग ३
मी तुमची मैत्रीण सौ सुनिता शैलेंद्र गायकवाड. स्कीन आणि हेअर एक्सपर्ट. द कंप्लीट स्कीन आणि हेअर ची संस्थापिका. १७ वर्षे ब्युटी या क्षेत्रात कार्यरत आहे. आणि येत्या तीन वर्षात मला 25 हजार मैत्रिणींचे स्किन आणि हेअर चे प्रॉब्लेम दूर करून त्यांना अधिक सुंदर बनवणे हा माझा ध्यास. मी तुम्हाला फेशियल बद्दल चे फायदे भाग ३ मध्ये पुढील फायदे सांगणार आहे ते तुम्ही नक्की वाचा.
११. त्वचेमध्ये टाईट पणा येतो.
पूर्वीच्य काळात आपण बघितले आहे. वयाच्या आधीच बऱ्याच व्यक्तीची स्कीन लूज पडू लागलेली. आणि त्याचे वय कमी असले तरी त्या चालू वयापेक्षा ही त्याचे वय अधिक वाटत असे. त्या मानाने आजची स्री ही रेगुलर फेशियल केल्याने तिची स्कीन टाईट राहते. तिच्या रिअल वया पेक्षा ती लहान दिसते.त्या मुळे नियमित फेशियल करणे कधीही चांगले.
वाढत्या वयाबरोबरच कोलेजनचे प्रमाण कमी होऊ लागते. ज्यामुळे त्वचेतील टाईटपणा ही कमी होतो. त्यामुळे फेशियल केल्याचा फायदा होऊ शकतो. कारण फेशियल च्या वेळेस एक्सपर्ट केमिकल पिल, फेस पॅक, लोशन आणि क्रीम याचा वापर करतात. हे सगळे प्रोडक्ट मध्ये बॉटेनिकल एक्सट्रॅक्ट असतात. जे कोलेजनचे प्रमाण वाढवायला मदत करतात. आणि त्यामुळे त्वचा टाईट होऊन सुरकुत्या कमी करायला मदत करतात.
१२. आय बॅग्स आणि डार्क सर्कल होतात कमी.
ताण तणाव, टेंशन,सतत कॉम्प्युटरवरील काम, रात्री नीट झोप न येणे ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या डोळ्यावर होत असतो. त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ होतात.
डोळ्याखालील वर्तुळावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणची त्वचा चेहऱ्यावरील दुसऱ्या भागा पेक्षा पातळ असते. जेव्हा आपण यावर योग्य पद्धतीने लक्ष देत नाही, त्यावेळेस डोळ्याखाली सूज येणे रिंकल येणे, आणि डार्क सर्कल दिसू लागतात. अशावेळेस एक्सपर्ट ला माहित असतं की तुमच्या डोळ्याची, आजूबाजूच्या नाजूक त्वचेची काळजी कशी घ्यावी. त्यांच्याद्वारे उपयोगात आणलेली डोळ्यासाठीची क्रीम विशेष डोळ्याच्या आजूबाजूच्या संवेदनशील त्वचेसाठी बनवलेली असते. तसेच ती अँटी एजिंग साठी ही गुणकारी असते. तुमच्या त्वचेच्या फेशियल च्या दरम्यान एक्सपर्ट काकडीचा सुद्धा वापर करायला सांगतात. ज्यामुळे डोळ्यांना थंडावा, गारवा मिळतो. खीरा (काकडी) मध्ये विटामिन के असते. जे तुमच्या डोळ्याखालील त्वचेला हायड्रेट करते. डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या घालून टाकायला ही मदत होते.
१३. मुलायम आणि चमकदार बनते त्वचा
सौंदर्यप्रसाधक चेहऱ्यासाठी योग्य प्रकारचे प्रोडक्ट तयार करतात. ज्याला विशेष पद्धतीने त्वचेच्या प्रकारानुसार डिझाईन केलं गेलेलं असतं. हे त्वचेला हायड्रेट करतात, आणि त्वचेवरील रोम छिद्र क्लीन करायला मदत करतात. यामध्ये असे घटक सुद्धा असतात, जे हाइपर पिग्मेंटेशन कमी करून तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार बनवतात.
१४. त्वचेची शोषण क्षमता वाढवतात.
नियमितपणे फेशियल करण्याच्या फायद्या मध्ये अजून एक फायदा असा आहे, की फेशियल मधील उत्पादने प्रभावीपणे शोषण करून त्वचेची क्षमता वाढवतात. कित्येक वेळा आपण वेगवेगळ्या कॉस्मेटिक उत्पादकांवर अधिक पैसा खर्च करत असतो. परंतु ते वापरात आल्यानंतर कळते की ते तुमच्या त्वचेमध्ये व्यवस्थित पणे शोषण करत नाही. अश्यावेळेस तुमच्या मनात विचार येतो की असं का? याचे उत्तर हे आहे की, तुमची त्वचा इतकी खराब झाली आहे की, कोणत्याही प्रकारचे उत्पादक तुमच्या त्वचेवर योग्य पद्धतीने शोषण करू शकत नाहीये. त्यामुळे नियमीत फेशल ने तुमची त्वचा मुलायम आणि उत्पादक शोषित करण्यासाठी तयार होते.
१५. त्वचेला मिळते विशेष जपणूक.
फेशिअलचे फायदे होण्याचं अजून एक कारण हे आहे की, त्वचेवर विशेष चर्चा केली जाते, कोणत्याही फेशियलच्या आधी विशेष सौंदर्यप्रसादक तुमच्या त्वचेचा प्रकार आणि तुमची त्वचा प्रत्येक दिवशी ज्या समस्यांचा सामना करते, त्याबद्दल विचारपूस करतात. ते समस्याचे समाधान करण्याच्या आधी त्वचेची पाहणी करतात. नंतर त्यानुसारच उपचार किंवा उत्पादक वापरतात जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.
१६. त्वचेचा रंगात उजळपणा येतो.
गोरेपणा प्रत्येकालाच हवा असतो. परंतु कधीकधी तुमच्या त्वचेवर काळे पॅच किंवा दाग तुमच्या चिंतेचं कारण बनत जाते. ते दुसरे काही नसून मेलेनिन असतं. जी त्वचा आणि केसांना त्याचा रंग देत असते. वृद्धावस्थेत सूर्याचे हानीकारक किरणे आणि हार्मोनल इनबॅलन्स यामुळे मेलेनिनचे प्रमाण कमी होऊ शकतात. ज्याचा परिणाम स्वरूप काळे डाग होतात. अशावेळेस फेशियलने काळे डाग कमी करता येतात. आणि तुमच्या त्वचेमध्ये उजळपणा आणता येतो.
इतके तर तुम्ही समजलाच असाल की फेशियल चे फायदे अनेक आहेत.
माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.
तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.





Khupch important information dili ahe good work
उत्तर द्याहटवा