फेशियल करण्याचे 16 फायदे भाग २
ब्लॉग नंबर १०.
फेशियल करण्याचे 16 फायदे - भाग २
मी तुमची मैत्रीण सौ सुनिता शैलेंद्र गायकवाड. स्कीन आणि हेअर एक्सपर्ट. द कंप्लीट स्कीन आणि हेअर ची संस्थापिका. १७ वर्षे ब्युटी या क्षेत्रात कार्यरत आहे. आणि येत्या तीन वर्षात मला 25 हजार मैत्रिणींचे स्किन आणि हेअर चे प्रॉब्लेम दूर करून त्यांना अधिक सुंदर बनवणे हा माझा ध्यास. मी तुम्हाला फेशियल बद्दल चे फायदे भाग २ मध्ये पुढील फायदे सांगणार आहे ते तुम्ही नक्की वाचा.
६. त्वचा डिटॉक्सिफाय होते -
आपल्यालाआपली बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. भरपूर व्यायामाची गरज असते. त्यामुळे आपल्या शरीरावर घाम येऊन आपली बॉडी डिटॉक्सिफाय होत असते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेलाही त्याची गरज असते. ती कशी, हे मी तुम्हाला पुढे सांगत आहे.
ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये विषारी घटक जमत असतात. त्याच प्रमाणे आपल्या त्वचेवर ती घाण जमत असते. जर योग्य पद्धतीने त्याची सफाई झाली नाही, तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेला हे उपाय करणे गरजेचे आहे. प्रत्येक दिवशी चेहरा साफ करणे जितके महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे फेशियल ही तितकेच जरुरी आहे. एक्सपर्ट तुमच्या चेहऱ्यावर तेज आणि उजळ त्वचा कायम ठेवण्यासाठी फेशियल च्या वेळेस अनेक प्रकारचे सामग्री जसं की ऑक्सीडेंट युक्त क्रीम, समुद्री नमक, हर्बल एक्सट्रॅक्ट आणि अनेक प्रकारची तेलं यांचा वापर करत असतात. जे घरात स्वतः करणे मुश्कील असते.
७. एकने, पिंपल्स आणि डाग होतात कमी -
माझ्या पार्लर मध्ये वेगवेगळ्या स्कीन ट्रीटमेंट केल्या जातात. किरण माझ्या पार्लर मध्ये आली. चेहऱ्यावर मोठे पिंपल्स होते. खड्डे होते, पिंपल्सच्या डागांमुळे चेहरा ही काळवंडलेला दिसत होता. तिला पिंपल्स ट्रीटमेंट करण्यास सांगितले. 3 महिने तिने अगदी मी सांगितले तशी ट्रीटमेंट घेतली त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जाऊन चेहऱ्यावर ग्लो आला. आणि खड्डे ही नाहीसे झाले.
एकने, पिंपल्स स्कीन ट्रीटमेंट न घेता ही वातावरणानुसार कमी जास्त होत असतात. पण ते ठीक झाल्यानंतर चेहऱ्यावर डाग सोडतात, पिंपल्स चे डाग खूप जिद्दी असतात. परंतु फेशियल ने यापासून सुटका मिळते.
सौदर्य मार्गदर्शक पिंपल्स चा इलाज करताना सैलीलिक एसिड युक्त उत्पादनाचा वापर करतात. अभ्यासातून हे समजतं की सैलिलिक एसिड ने पिंपल्स आणि त्यापासून होणारे निशान कमी करायला मदत करते.
८. व्हाइटहेडस आणि ब्लॅकहेडस होतात नष्ट -
सौदर्य प्रसादक फेशियलचा एक महत्वाचा भाग आहे. एक एक्सपर्ट ब्युटीशियन त्रास न होता व्यवस्थित पद्धतीने ब्लॅक हेड्स, व्हाईट हेडस क्लीन करतात. सौदर्य प्रसाधनाच्या टूलचा वापर करतात. आपण ते स्वतः करू शकत नाही. ब्लॅकह हेडस, व्हाईट हेड्स त्वचेला तेजहीन बनवतात. जर तुम्हाला तुमची त्वचा ड्राय आणि तेजहीन वाटत असेल, तर समजून जा की तुम्हाला फेशियल करायची गरज आहे.
९. चेहऱ्याचे रोम छिद्र ओपन होतात -
रोजच्या दिनचर्येमध्ये त्वचेला धूळ माती आणि प्रदूषण पासून वाचवणे असंभव आहे. त्याचबरोबर सूर्याच्या प्रखर उन्हाचा परिणाम ही त्वचेवर होत असतो. हळूहळू ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या स्कीन वर होऊ लागतो. आणि त्वचेवरील रोम छिद्र बंद होऊ लागतात. फेशियल करताना एक्सपर्ट स्टीमच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावरील रोम छिद्र ओपन करून साफ करतात. त्याचबरोबर मृत पेशी हटवून एकणे, पिंपल्स आणि इतर त्वचेचे प्रॉब्लेम पासून तुमच्या त्वचेला वाचवतात.
१०. त्वचा एक्सफोलीएट होते -
एक्सफोलीएशन ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे मृत पेशी तयार होतात. जर या मृत पेशींना काढले नाही, तर त्वचेवर त्याचा लेअर जमत राहतो. ज्यामुळे तुमची त्वचा सुखी आणि रुक्ष दिसते तुम्ही घरी स्क्रब चा वापर करू शकता, पण त्वचेला एक्सफोलीएट करणेही गरजेचे असते. परंतु योग्य पद्धतीने मसाज केले तर मृत पेशी काढता येतात. त्यासाठी फेशियल हा योग्य उपाय आहे. फेशिअल च्या दरम्यान तुम्ही केमिकल पिल्सचा सुद्धा वापर करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगल्या पद्धतीने साफ केली जाते. आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर दिसते.
इतके तर तुम्ही समजलाच असाल की फेशियल चे फायदे अनेक आहेत.फेशिअल चे पुढील फायदे वाचण्यासाठी भाग ३. नक्की वाचा. लवकरच मी तो तुमच्यासाठी घेऊन येत आहे.
माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.
तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.
े




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा