फेशियल करण्याचे 16 फायदे भाग १.

 ब्लॉग नंबर ९.

फेशियल करण्याचे 16 फायदे भाग १.



     प्रत्येकाची त्वचा ही वेगळी वेगळी असते प्रत्येकाला वाटत असते की आपली त्वचा कोमल आणि मुलायम असावी. म्हणून प्रत्येक महिला किंवा पुरुष आपली त्वचा छान असावी म्हणून  प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या क्रीम किंवा लोशनचा वापर केला जातो. किंवा काहीजण घरगुती उपाय करत असतात. हे जरी केले तरी त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी फेशियल करणे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे फेशियलचे फायदेही अनेक आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात फेशियल बद्दल बऱ्याच चुकीच्या कल्पना असतात. कित्येक जणांना वाटते की फेशियल तुमच्या त्वचेला थोड्या वेळा पुरता उजळ बनवते. तसेच काहींना वाटते की एकदा फेशियल केले की वारंवार फेशियल करावे लागते. असे जरी असले, तरी त्याचे आज मी तुम्हाला फायदे काय आहे, आणि फेशियल करणे तुमच्या त्वचेसाठी का गरजेचे आहे, हे सांगणार आहे. 

     हे महत्त्वाचे नाही, की जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स आहेत, किंवा वांग, पिगमेंटेशन असेल तरच फेशियल करावे, जर तुम्हाला तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवायची असेल तर फेशियल करणे गरजेचे आहे. हार्मोनल इन बॅलेन्स, ताणतणाव, प्रदूषण आणि इतर काही गोष्टीं पासून तुम्हाला तुमच्या त्वचेचं रक्षण करायचे असेल तर फेशियल हा एक त्यावरील चांगला उपाय आहे. तुमच्याकडे त्वचेला चांगले ठेवण्यासाठी बरेच घरगुती उपाय असतात. परंतु कधीकधी तुमच्या त्वचेसाठी विशेष तज्ञांची गरज असते. जी तुमच्या त्वचेसाठी काय चांगले आहे किंवा नाही हे समजून त्या पद्धतीने त्यावर उपचार करतात. या व्यतिरिक्त चेहऱ्याचा मसाज फक्त तुमच्या चेहऱ्यावर चमकच देत नाहीत, तर तुम्हाला ताण-तणावापासून पण दूर ठेवतात. जर तुम्हाला अजूनही विश्वास होत नसेल, तर फेशियल चे फायदे बघितल्यानंतर कदाचित तुमचे फेशियल बद्दलचे मत बदलेल. 



      मी तुमची मैत्रीण सौ सुनिता शैलेंद्र गायकवाड. स्कीन आणि हेअर एक्सपर्ट. द कंप्लीट स्कीन आणि हेअर ची संस्थापिका. १७ वर्षे ब्युटी या क्षेत्रात कार्यरत आहे. आणि येत्या तीन वर्षात मला 25 हजार मैत्रिणींचे स्किन आणि हेअर चे प्रॉब्लेम दूर करून त्यांना अधिक सुंदर बनवणे हा माझा ध्यास.पुढे मी तुम्हाला फेशियल बद्दल चे फायदे सांगणार आहे ते तुम्ही नक्की वाचा.

1. ताण तणाव कमी होतो.



   माझ्या पार्लर मध्ये एक क्लाइंट आली होती, अतिशय दमलेली थकलेली, लॉक डाऊन मध्ये घरातली काम, ऑफिस त्यात बाई ही नाही, त्यामुळे अतिशय दमून गेलेली. ऑफिसचे कामही डोक्यावर होते  पार्लर मध्ये आल्यानंतर ती म्हणाली मला फ्रेश व्हायचं आहे. त्यासाठी मी काय करू तिला मी एक छान फेशियल केले. फेशियल नंतर तिच्या चेहऱ्यावर चमक आली. फेशिअल च्या दरम्यान तर अक्षरशः खूप छान झोप आली होती. फेशिअल पूर्ण झाल्यावर तिला इतक रिलॅक्स आणि फ्रेश वाटत होते. जणू खरंच तिच्या वर असलेला इतक्या दिवसाचा ताण खूप प्रमाणात कमी झालेला होता. आणि त्यामुळे ती खरंच खूप आनंदी झाली होती.

     आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक काम, घर आणि बाकीच्या गोष्टीत इतके बिझी आहेत. की ते स्वतः कडे लक्ष देत नाहीत. त्याच प्रमाणे ते ताण तणावपूर्ण आयुष्य जगत असतात. त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर होत असतो. एका अभ्यासानुसार त्यामुळे सिंथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते.  फेशियल ताण-तणाव कमी करते. तुमचा मूड चांगला करते, तुमच्या चेहऱ्यावर शेकडो एक्यूप्रेशर पॉइंट असतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या भागाशी जोडलेले असतात. जेव्हा एक्युप्रेशर ने बिंदूना मसाज केले जाते, तेव्हा तुमचे शरीर त्याने प्रोत्साहित होते. चेहऱ्यावरील मालिश मुळे तुमची त्वचा चमकदारच होत नाही, तर बाकीच्या भागावर ही त्याचा फायदा दिसत असतो. हे तुमच्या चेहऱ्यासाठी एक प्रकारचा व्यायामच आहे. तुमच्यासाठी चेहऱ्यावरील प्रेशर पॉईंट ओळखणे अवघड जाऊ शकते. त्यासाठी एक प्रोफेशनल व्यक्तीची गरज असते. जी तुमच्या चेहऱ्याचे योग्य प्रेशर पॉईंट ओळखून योग्य पद्धतीने मसाज करू शकते.

2. त्वचा स्वच्छ होते.



      सोनिया बऱ्याच दिवसाने पार्लरमध्ये आली होती. बरेच दिवस तिने चेहऱ्यावर काहीच केले नव्हते. त्यामुळे चेहरा अगदी निस्तेज झाला होता. चमक ही नाहीशी झालेली. खूप डल वाटत होता तिचा चेहरा.  तिने फेशियल करून घेतले.  फेशियल केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर चमक आली. चेहरा क्लीन झाला होता. खूप सुंदर दिसत होती ती. 

     धूळ माती आणि प्रदूषणामुळे त्वचा ड्राय, निर्जीव आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक नष्ट होऊ लागते. अशा मध्ये चांगल्या प्रकारचे फेशियल केले की तुमची त्वचा आतुन क्लीन होऊ शकते. तुम्ही फेसवॉश वापरा, किंवा घरगुती गोष्टींचा वापर करा, पण तुमची त्वचा आतून क्लीन होत नाही. त्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट चे मार्गदर्शन आणि मदत घेणे गरजेचे असते. एक्सपर्ट तुमची त्वचा ओळखून त्या प्रकारे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून तुमची त्वचा क्लीन करून ते तुमच्या त्वचेचे छिद्र ओपन करून त्वचा चांगल्या प्रकारे क्लीन करण्यासाठी स्टीमर चा वापर करून तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून त्याप्रमाणे फेशियल करण्याचे मार्गदर्शन करते.

3. त्वचेचा सुरकुत्या पासून बचाव होतो.



     माझी मैत्रीण आज पन्नास वर्षाची आहे. दर महिन्यात ती न चुकता फेशियल करते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर नेहमी मसाज केला जातो. त्यामुळे अजूनही तिचा चेहरा चिरतरूण दिसतो. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाही. दर महिन्यात फेशियल केल्यामुळे सुरकुत्या पासून मुक्तता मिळते. त्यामुळे दर महिन्यात फेशियल करणे किती महत्वाचे आहे. हे आपल्याला कळणे फार गरजेचे आहे.

     आपणा सर्वांनाच माहित आहे, की वाढत्या वयाचा प्रभाव आपल्या त्वचेवर ही दिसत असतो. वय वाढल्याने त्वचेवर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दिसायला लागतात. त्यामुळे त्वचेची चमक नाहीशी होते. वाढत्या वयाबरोबर त्वचेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आणि त्यासाठी नियमित स्वरूपात फेशियल करणे कधीही चांगले. आणि गुणकारी असते. नियमित फेशियल आणि मसाज केल्याने तुमच्या त्वचेला आणि कोशिकांना पुनर्जन्म मिळतो. त्याच बरोबर कोलेजनचा विकास होण्यास मदत होते. आणि त्वचा तरुण दिसायला लागते. त्याचप्रमाणे फेशियल मुळे सुरकुत्या पासून काहीप्रमाणात बचाव होतो. परंतु लक्षात ठेवा फेशिअल फाईन लाईन्स किंवा रिंकल्स ला घालवण्यासाठी प्रभावकारी होऊ शकत नाही.

४. रक्तप्रवाहात सुधारणा होते.

     असं म्हटलं जातं की मसाज ने शरीरातील रक्त प्रवाह वाढतो. हाच नियम तुमच्या चेहर्‍यासाठीही लागू आहे. फेशियल मुळे  चेहऱ्यावरील रक्तप्रवाह अधिक चांगला होतो. त्याच बरोबर पेशींना भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळतात. यामुळे तुमच्या पेशी ॲक्टिव होतात. आणि चेहऱ्यावर चमक व उजळपणा येतो.

५. त्वचा तरुण दिसायला लागते 



     वाढत्या वयाबरोबर त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचेवरील चमक कमी होणे, ही साधी गोष्ट आहे. परंतु आजकालच्या जीवनशैलीत धूळ माती आणि प्रदूषण ह्यामुळे बऱ्याचदा वेळेच्या आधीच चेहऱ्यावरील चमक जाऊ लागली आहे. अशामध्ये फेशियल करणे हे फायदेशीर असते. त्यामुळे चेहऱ्या वरील त्वचेत जीव येतो. त्वचा विशेषतज्ञ फेशियल च्या विविध पद्धती, वस्तू आणि टेक्नॉलॉजीचा वापर करतात. जे तुमच्या त्वचेला सुंदर बनवायला मदत करते.

    इतके तर तुम्ही समजलाच असाल की फेशियल चे फायदे अनेक आहेत. फेशिअल चे पुढील फायदे वाचण्यासाठी भाग २. नक्की वाचा. लवकरच मी तो तुमच्यासाठी घेऊन येत आहे.

माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

     हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.

      तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.

फेसबुक ग्रुपची लिंक मी इथे दिली आहे.

  े

 



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा

लोकप्रिय पोस्ट