४ महत्वाच्या टिप्स वापरून हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी

ब्लॉग नंबर ८.

 ४ महत्वाच्या टिप्स वापरून हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी.



     हिवाळा ऋतु म्हणजे गुलाबी थंडी आणि त्यातली मजा काही वेगळीच असते उन्हाळ्याची गर्मी नाही ही पावसाने होणारा चिखल नाही. ही थंडी सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी असते. पण ज्यांची स्कीन ड्राय आहे त्यांचं काय? बापरे! नको तो हिवाळा. स्कीन ड्राय होणार चेहऱ्यावर पांढरे प्यच आणि त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उभ्या राहणार.

     असे तुम्हालाही वाटत आहे का मी तुमची मैत्रीण सौ सुनिता शैलेंद्र गायकवाड. स्कीन आणि हेअर एक्सपर्ट द कंप्लीट स्कीन आणि हेअर ची संस्थापिका सतरा वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे. आणि येत्या तीन वर्षात मला 25 हजार मैत्रिणींचे स्किन आणि हेअर चे प्रॉब्लेम दूर करून त्यांना अधिक सुंदर बनवणे हा माझा ध्यास.

     तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का, थंडीत तुमची त्वचा तजेलदार आणि मुलायम कशी करता येईल ते. माझा हा ब्लॉग नक्की वाचा.

१. कोमट पाण्याने अंघोळ करावी



      हिवाळ्यात थंडी असल्याने गरम पाण्याने अंघोळ केली जाते. आधी गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करावा, अनेक मॉइश्चरायझर साबण मार्केटमध्ये उपलब्ध  आहेत त्या साबणाचा किंवा शॉवर जेल चा तुम्ही वापर करू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम राहू शकते.

     जास्त गरम पाण्यामुळे तुमची त्वचा अधिक ड्राय होऊ शकते. तसेच कोणत्याही प्रकारचा साबण वापरला तर त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.

२. बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर क्रीम चा वापर करावा.



      हिवाळ्यात हवेमध्ये कोरडेपणा असतो. त्यामुळे त्वचेवरील ओलावा नष्ट होतो. अशा वातावरणात ऑईली स्किन,नॉर्मल स्कीन जरी असेल, तरी अशा स्क्रीनवर ही हिवाळ्यात ड्रायनेस येतो. त्यामुळे प्रत्येकाच्या स्कीन नुसार चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशनचा वापर करावा. खूप ड्राय स्किन असेल तर ज्या बॉडी लोशन मध्ये दूध आणि ग्लिसरीन चे प्रमाण मुबलक प्रमाणात असेल अशा बॉडी लोशनचा वापर करावा.

३. फेस पॅक


     हिवाळ्यात तुम्ही घरच्या घरी फेसपॅक बनवून लावू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही तुम्ही वेगवेगळे पॅक बनवून फेस वर लावू शकता. ज्यामध्ये ई विटामिन असते असे पॅक तुम्ही वापरू शकता. बेसन, बदामाचे तेल, खोबऱ्याचे तेल, काकडी, दूध, अश्या घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही तज्ञांच्या सल्ल्याने फेस पॅकचा वापर करू शकता.

४. चांगला आहार घेण.



     चांगला व पोषक आहार घ्यावा. आपल्या आहाराचा आपल्या शरीर, स्कीन आणि हेअर वर परिणाम होत असतो. त्यामुळे योग्य आहार घेणे गरजेचे आहे. आहारात सॅलड, दूध,  पनीर, चीझ अश्या गोष्टींचा समावेश असावा.

माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

     हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.

      तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.

फेसबुक ग्रुपची लिंक मी इथे दिली आहे.
https://www.facebook.com/109156760873749/posts/305099024612854








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा

लोकप्रिय पोस्ट