पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी
ब्लॉग नंबर ७.
पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी.
मी सौ. सुनिता गायकवाड स्कीन आणि हेअर एक्सपर्ट आणि द कंप्लीट स्कीन आणि हेअर ची स्वस्थापिका,१७ वर्ष ब्युटी ह्या क्षेत्रात कार्यरत आहे. येत्या 3 वर्षात २५,००० महिलांना अधिक सुंदर बनविणे हा माझा ध्यास आहे. तर जाणून घेऊ या पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी.
त्वचा आणि केस कोरडे राखा
पावसाळ्याच्या दिवसात डोक्यावरील केस व त्वचा अत्यंत नाजूक बनते भिजून आल्यावर आपली त्वचा आणि डोके कोरडे न केल्यास बुरशीच्या वाढीला प्रोत्साहन मिळते ज्यांना कोंडा होण्याची सवय आहे अशा व्यक्तींच्या केसांमध्ये खाज सुटणे बारीक संसर्गजन्य पुरळ होणे व त्यातून रक्त येणे अशा गोष्टी दिसून येतात कोंडा मुळे केस गळणे सुरू होते तसेच कोड्यामुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा पिंपल्स यायला सुरुवात होते त्यामुळे केस कोरडे ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
त्वचेचे विकार
हवेतील आर्द्रतेमुळे सतत येणाऱ्या घामामुळे विषाणू चा संसर्ग वाढतो गुडघ्याच्या मागे, पायांच्या बोटांमध्ये याची वाढ सर्वात जास्त प्रमाणात होऊन, पायांना चिखल्या पडणे दोन बोटांच्या मध्ये खाज येणे, त्वचा लाल होणे, असे विकार दिसू लागतात. तसेच त्वचा फटल्या सारखी ही होते.
चेहऱ्याची स्वच्छता राखा
चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी फेस वॉश चा वापर करावा. त्यामुळे तुमची त्वचा ताजीतवानी राहते. तसेच हे घटक मळ काढून चेहऱ्यावरील छिद्र मोकळी करतात. साबण लावणे शक्यतो टाळावे. त्याचप्रमाणे जास्त खसखसून चेहरा धुणे, किंवा दिवसातून जास्त वेळा चेहरा धुणे शक्यतो टाळावे. यामुळे तुमच्या चेहर्यावरील नॅचरल ऑइल कमी होते.
त्वचेला क्लींजिंग आणि टोनिंग करावे
कधीही बाहेरून आल्यानंतर स्वतःचा चेहरा क्लिंजिंग मिल्क ने साफ करावा. तुमच्या चेहऱ्यावर जर पुरळ असतील तर अंटीबॅक्टेरियल क्लिंजींग मिल्क चा वापर करावा. ज्यामुळे पोर्स उघडतात आणि त्यातील घाण साफ होते. तसेच क्लींजींग मिल्क नंतर टोनिंग करणेही गरजेचे आहे त्यामुळे चेहऱ्यावरील सुंदरता आणि चमक टिकवण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील जे अधिक तेल असते ते नियमित राहते आणि धूळ मातीच्या कारणामुळे जमा झालेली घाणही साफ होते.
माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.
तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.





सुंदर ब्लॉग.अगदी उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाThanks tai
उत्तर द्याहटवाwow chup chan👌👌👌
उत्तर द्याहटवाwow khup chan👌👌👌
उत्तर द्याहटवाwow khup chan 👌👌👌
उत्तर द्याहटवाwow khup chan 👌👌👌
उत्तर द्याहटवाwow khup chan 👌👌👌
उत्तर द्याहटवाwow khup chan 👌👌👌
उत्तर द्याहटवाwow khup chan 👌👌👌
उत्तर द्याहटवाThanks neeta
उत्तर द्याहटवा