आजीच्या बटव्यातील सौदर्य रहस्य

ब्लॉग नंबर ६.

आजीच्या बटव्यातील सौदर्य रहस्य



     आपल्याला जर सौदर्य बद्दल काही तक्रारी असेल तर सर्व प्रथम आपण आजीच्या टिप्सचा वापर करतो. आजीकडे प्रत्येक गोष्टीची माहिती असते. तसेच आजीलाह्या गोष्टीची माहिती असणारच असा आपला दृढ विश्वास असतो. अगदी लहान पणी ही आपल्याला काही लागले, खरचटले की आपण आजीकडे जातो. आजीकडे प्रत्येक गोष्टीसाठी औषध तयार असते. आणि अगदी घरगुती गोष्टीचा वापर करून.

     तसेच आजीने सांगितलेल्या घरगुती गोष्टीचा साईड इफेक्ट तर नक्कीच नाही होणार ह्याची आपल्याला खात्री असतेच.

     ह्या लॉकडाऊनमध्ये पार्लर ही बंद आहेत तर तो पर्यंत आपण घरच्या घरी आपण आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायची ते सांगणार आहे असं काय करावे ज्यामुळे आपला चेहरा सुंदर राहील त्यासाठी घेऊन येत आहे आजीच्या घरगुती सौंदर्य टिप्स. 

     मी सौ. सुनिता गायकवाड  स्कीन आणि हेअर एक्सपर्ट आणि द कंप्लीट स्कीन आणि हेअर ची स्वस्थापिका, येत्या 3 वर्षात २५,००० महिलांना अधिक सुंदर बनविणे हा माझा ध्यास आहे. त्यासाठी घेऊन येत आहे तुमच्या साठी आजीच्या बटव्यातील सौंदर्य रहस्य.

हळदीची जादू



     आपल्याला काही लागले किंवा खरचटले तर आजी त्याच्यावर हळद लावत असे. हळदीमध्ये अँटीबॅटेरियल अँटीसेप्टिक आणि अँटिऑक्सिडंट गुण असतात. जे  एकत्र मिळून चेहऱ्यावरील डाग धब्बे मिटवून ऍकने सुद्धा घालवण्यासाठी उपयोगी ठरतात.  त्याचप्रमाणे ते त्वचेला चमकदार आणि गोर बनवायला ही मदत करतात त्यामुळे तुमच्या फेसपॅक मध्ये याचा वापर जरूर करावा.

चेहऱ्यावर ब्लिच करण्यासाठी लिंबू आणि खिरा ( काकडी) चा रस 


     पूर्वीच्या काळी चेहऱ्या वरील tan घालवण्यासाठी खीरा आणि लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावला जात असे हे दोन्ही रस चेहऱ्यावरील डाग काढून टाकायचे काम करते.

बटाट्याने नष्ट करा डोळ्याखालील काळी वर्तुळे



     आजीच्या बटव्यातील एक रहस्य म्हणजे डोळ्याच्या खाली जी काळी वर्तुळे आणि सुज असते ती दूर करायची असेल तर कच्चा बटाटा कापून डोळ्यावर पाच ते दहा मिनिट ठेवावा. तुम्हाला लवकरच त्याचा रिझल्ट बघायला मिळेल.

आवळयातील गुण



     जर तुम्हाला तुमचे केस काळे लांब आणि मजबूत हवे असतील तर तुमच्या डायटमध्ये आवळ्याचा वापर करा. ह्यामध्ये विटामिन सी असल्याने तुमचे केस मजबूत होतात. त्याचबरोबर केसातील ( डँड्रफ ) कोंडा आणि (हेअर फॉल ) केस गळणे यासारख्या समस्या दूर होतात.

लांब आणि मजबूत केसांसाठी मेथी


    आपल्याला माहितीच आहे कि लहानपणी आपल्याला सांगितले जायचे की केसांना आवळा, रीठा, शिकाकाई लावून केस धुवावेत त्यातच एक आहे मेथी. मुठभर मेथी घेऊन ती रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट करून ते केसांमध्ये लावली तर केस मजबूत होतात. ह्यामुळे प्रोटीन आणि निकोटिन ची मात्रा वाढते. त्याचबरोबर त्यातील पोटॅशियम या घटकांमुळे वयाच्या आधी जे केस पांढरे झालेले असतात, ते काळे व्हायला मदत होते.

माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
     हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.
      तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात  काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर  कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.
      फेसबुक ग्रुपची लिंक मी इथे दिली आहे.
https://www.facebook.com/109156760873749/posts/305099024612854


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा

लोकप्रिय पोस्ट