प्राचीन काळातील राणीचे ब्युटी सिक्रेटस

ब्लॉग नंबर ५.

प्राचीन काळातील राणीचे ब्युटी सिक्रेटस

     जर तुम्हाला लांब केस आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर जाणून घ्या प्राचीन काळातील राणीचे ब्युटी सिक्रेट्स. प्राचीन काळात त्या कोणत्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करत असे. ज्यामुळे तुम्हाला ही त्याचा फायदा होऊ शकतो.

     तुम्हालाही वाटत आहे, तुम्ही सुंदर दिसावं, पण आपण रोज त्यासाठी काय काळजी घ्यावी. असे काय करावे की ज्यामुळे तुमची त्वचा छान राहील. हे सगळ तुम्हाला जाणुन घ्यायचे आहे का, मी सौ. सुनिता गायकवाड. कुशल ब्युटी आणि हेअर केअर ची संस्थापिका, घेऊन येत आहे तुमच्यासाठी हा ब्लॉग, हा ब्लॉग  नक्की वाचा.


हेल्दी त्वचेसाठी नीम 



                
       नीम च्या झाडाचा प्रत्येक भाग हा औषधी म्हणून फायदेशीर ठरतो.  चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी काही पानांना पाण्यात उकळवून आणि नंतर त्या पाण्यात कापूस भिजवून त्याचा चेहऱ्यावर टोनर सारखा वापर करावा. हवे असल्यास दही आणि नीम मिक्स करून पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकतो हा पॅक लावून नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. त्याचप्रमाणे त्याकाळात राणीचे केस पण चमकदार असायचे त्या काळात त्यांच्या केसात नीमच्या तेलाने मालिश केली जात असे. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस पण चमकदार होतात. 

चेहऱ्यावरील ग्लो  वाढवण्यासाठी केशर उपयुक्त

     चेहऱ्यावरील रंग उजळण्यासाठी प्राचीन काळातील राणींनी केशरला खूप लोकप्रिय बनविले आहे. फ्रान्समध्ये केसरची शेती तेराव्या शतकात सुरू केली होती त्यामुळे असे मानले जाते की केसर पण तितकेच जुने आहे. आपल्या शरीराचा रंग उजळण्यासाठी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी क्लियोप्याटरा  घोडीच्या दुधात केशर टाकून त्याने स्नान करत असे  चेहऱ्यावरील काळपटपणा घालवायचा असेल तर रात्रभर केशर मलाई किंवा दुधात भिजवून सकाळी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.

डाग धब्बे आणि जळन चे निशाण घालवण्यासाठी मधाचा वापर



     सतराव्या शतकापासून लोकांनी मधाचा वापर करण्यास सुरुवात केली. तुम्ही कच्चा मध जळालेल्या भागावर लावू शकता. कारण यामध्ये अँटीसेप्टिक आणि हीलींग चे गुण असतात. सातत्याने जळालेल्या भागावर मध लावल्याने डाग लवकर जाऊ शकतात. तुम्ही मध मलाई, चंदन आणि बेसन मध्ये मिक्स करून फेस पॅक म्हणून लावू शकता. हा मास्क चेहऱ्यावरील डाग धब्बे हटवून त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवतो.

पिंपल्स घालवण्यासाठी तुळशीचा वापर



प्राचीन काळातील लोक विंचू किंवा सापाने दंश केला की त्याच्यावर औषध म्हणून तुळशीचा वापर करीत असे. चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी आणि त्वचा हेल्दी बनवण्यासाठी तुळशीच्या काही पानांना वाटून पेस्ट बनवून या पेस्टमध्ये दूध मिक्स करा, आणि त्वचेवर लावा याच्याव्यतिरिक्त प्राचीन काळात जेव्हा लोकांकडे दात घासण्यासाठी टूथपेस्ट नव्हती, तेव्हा ते तुळशीच्या पानांची पेस्ट करून त्यात संत्रीच्या सालाची पावडर मिक्स करून दातांसाठी वापरत असे.

 अशाप्रकारे प्राचीन काळात अशा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून भारतीय राणी आपले सौंदर्य टिकवायच्या अशा नैसर्गिक टिप्स वापरुन आपण ही आपले सौंदर्य टिकवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो.

माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
     हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.
      तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात  काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर  कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.
      
फेसबुक ग्रुपची लिंक मी इथे दिली आहे.
https://www.facebook.com/109156760873749/posts/305099024612854
https://www.facebook.com/109156760873749/posts/282257820230308/

टिप्पण्या

  1. खुपच छान माहिती दिली.. अतिशय प्रत्येकाच्या जवळचे मनाला भावणाऱ्या ह्या टिप्स प्रत्येक स्त्रिया नेहमीच फॉलो करतील..

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान माहिती दिली.. अतिशय प्रत्येकाच्या जवळचे मनाला भावणाऱ्या ह्या टिप्स प्रत्येक स्त्रिया नेहमीच फॉलो करतील..

    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुंदर बलॉग.. खरंच आपले सौदर्य जपणे आपल्याच हातात आहे..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा

लोकप्रिय पोस्ट