पिंपल्स होण्याची ५ महत्वाची कारणे
ब्लॉग नंबर ४.
पिंपल्स होण्याची ५ महत्वाची कारणे
नमस्कार मैत्रिणींनो,
मी तुमची प्रिय सखी. तुमच्यासाठी घेऊन आले अजून एक ब्लॉग, किशोरवयात मुल आणि मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आणि त्याचा खुप त्रास होतो. आणि उन्हाळ्यात तर नकोसे वाटते. चेहऱ्यावर खूप खाज येते. त्यामुळे चेहरा ही छान दिसत नाही. सारखा हात पिंपल्स वर जातो. त्यामुळे चेहराही काळवंडलेला दिसतो. चेहरा सुंदर असला तरी सौदर्य नाहीस होत.
अगदी तुमच्या मनातलं बोलते ना. कारण मी तुमची प्रिय सखी सौ. सुनिता गायकवाड. कुशल ब्युटी आणि हेअर केअर ची संस्थापिका, तुम्हाला सगणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे. जाणुन घ्यायची आहेत ती करणं कोणती. तर हा ब्लॉग तुमच्यासाठी, नक्की वाचा.
१. पोट साफ न होणे
पोट साफ होत नसल्यामुळे शरीरातील नको असलेले विषारी पदार्थ त्वचेद्वारे बाहेर पडायला सुरुवात होते. शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते. तसेच रक्तात वाढणारी उष्णता यामुळे पिंपल्स वाढायला सरुवात होते. त्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच चेहरा दोन वेळेस वॉश करावा.
२. चुकीचा आहार
अति प्रमाणात तेलकट, मसालेदार, चमचमीत खाण्याने ही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यासाठी योग्य तो आहार घेणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे संत्री आणि द्राक्ष ह्या फळांचा आहारात वापर करावा.
३. हार्मोन्स इनबॅलन्स होणे
किशोरवयात शरीरात काही बदल घडत असतात. आणि शरीरातील हार्मोन्स ही इनबॅलन्स होत असतात. त्यामुळे ही चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. त्याच प्रमाणे बायकांमध्ये ही औषधांच्या दुष्परिणामांमुळे, गर्भधारणे मुळे ही हार्मोन्स इनबॅलन्स झाल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
४. कॉस्मेटिक चा वापर
फेअरनेस क्रीम चा वापर हल्ली बरेच जन करतात. मुळातच आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे. हे ओळखून त्या प्रकारची क्रीम कीवा फेसवॉश वापरले पाहिजेत. योग्य ती काळजी घेतल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी व्हायला मदत होईल.
५. ताण तणाव
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात दैनंदिन आयुष्य जगताना ताणतणाव चा सामना करावा लागतो. त्यामुळे ही पिंपल्स येतात. तसेच अनियमित मासिक पाळीमुळे ही पिंपल्स येऊ शकतात.
माझा हा ब्लॉग पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद!
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि तुम्हाला अजून काही टिप्स हवे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या ब्लॉगला लाइक, कमेंट आणि शेअर करा.
त्वचा आणि केस ह्याबद्दल तुम्हाला अजुन काही माहिती हवे असेल तर माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.
फेसबुक ग्रुपची लिंक इथे दिली आहे.
https://www.facebook.com/109156760873749/posts/282257820230308/






Khup chan blog 👍👍
उत्तर द्याहटवाThank you so much ❤️❤️ vaishali
उत्तर द्याहटवा