स्वयंपाक घरात सापडले सौदर्यचे रहस्य.

ब्लॉग नंबर ३.

स्वयंपाक घरात सापडले सौदर्यचे रहस्य.

     लॉकडाऊन मुळे तुम्ही घरात आहात आणि सगळे पार्लर ही बंद आहेत. गरमीने तुमचा चेहरा तेलकट होत आहे. आणि चेहरा काळवंडतो आहे. 

     दिवसरात्र घरातली कामं, ऑफिसच काम, आणि मुलांचा अभ्यास, सगळ्याच जबाबदाऱ्या तुमच्यावर आल्या आहेत. आणि त्यामुळे स्वतःकडे लक्ष ही देता येत नाही.

     घाबरु नका मी सौ. सुनिता गायकवाड कुशल ब्युटी आणि हेअर केअरची संस्थापिका घेऊन आले आहे तुमच्या साठी घरगुती फेसपॅक, स्वयंपाक घरातील सामुग्री पासुन तयार करून, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावून घरातील काम करू शकता. चला तर बघुया तो पॅक कोणता.


२ चमचे गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ कीवा तांदळाचे पीठ घेऊन त्यात दूध मिक्स करावे पॅक तयार होईल इतके आणि तो पॅक चेहऱ्यावर लावावा.


जर तुमची त्वचा कोरडी आहे तर वर सांगितल्या प्रमाणे कोणतेही पीठ २ चमचे घेऊन त्यात दूध आणि ४ थेंब मध टाकावा आणि ते मिक्स करून तो पॅक चेहऱ्याला लावावा. 


१० मिनिट चेहऱ्यावर ठेऊन हलक्या हाताने मसाज करावा. आहे चेहरा स्वच्छ धुवावा. हे आठवड्यात दोनदा करावे.

     माझा हा ब्लॉग पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद!

       माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि तुम्हाला अजून काही टिप्स हवे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या ब्लॉगला लाइक, कमेंट आणि शेअर करा.

       त्वचा आणि केस ह्याबद्दल तुम्हाला अजुन काही माहिती हवे असेल तर माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

      फेसबुक ग्रुपची लिंक इथे दिली आहे.

https://www.facebook.com/109156760873749/posts/282257820230308/

    





टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट