५ गोल्डन रुल्स

      ब्लॉग नंबर २.
 
     अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे सौदर्य ही सुधा काळाची गरज झाली आहे. स्री असो किवा पुरुष  सुंदर आणि टापटीप राहायला सगळ्यांनाच आवडते.
       ऑफिस मध्ये जाणारी महिला असो, किवा घरात राहून घर सांभाळणारी गृहिणी असो. प्रत्येकीला सुंदर दिसावं असे वाटत असते.
        तुम्हालाही वाटत आहे, तुम्ही सुंदर दिसावं, पण आपण रोज त्यासाठी काय काळजी घ्यावी. असे काय करावे की ज्यामुळे तुमची त्वचा छान राहील. हे सगळ तुम्हाला जाणुन घ्यायचे आहे का, मी सौ. सुनिता गायकवाड. कुशल ब्युटी आणि हेअर केअर ची संस्थापिका, घेऊन येत आहे तुमच्यासाठी हा ब्लॉग, हा ब्लॉग  नक्की वाचा.
   

५ गोल्डन रुल्स :-

 १. क्लींजिंग  क्रिम आणि मिल्क
२.  टोनर, स्किन टॉनिक, अस्ट्रीनजन, स्किन      
      फ्रेशनर.
३.  मॉइश्चरायझर
४.  थंडरिंग 
५.  फेस पॅक

१. क्लीन्सिंग, क्रिम आणि मिल्क : -

   तेलकट त्वचा स्वच्छ करण्यासाठी चेहऱ्यावरील धूळ कचरा साफ करण्यासाठी तसेच त्वचेची स्निग्धता राखण्यासाठी पाणी आणि क्रीम यांचा खूप फायदा होतो. चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठीही क्लीन्सिंगचा वापर करावा.
     कोरडी त्वचेवरील मेकअप आणि धूळ साफ करण्यासाठी क्लीन्सिंगचा वापर करावा.

२.  टोनर, स्किन टॉनिक, अस्ट्रीनजन  :-
      नॉर्मल त्वचा आणि कोरड्या त्वचे वर  स्कीन टॉनिक लावावे. आणि ओईली स्किन असेल तर अस्ट्रीनजन लावावे

३.  मॉइश्चरायझर आणि संनस्क्रीन लोशन  :-


      नॉर्मल, कोरडी आणि  तेलकट अशा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर आणि  संनस्क्रीन लोशन वापरावे. कोरड्या त्वचेसाठी उन्हाळ्यात आणि थंडीत  रात्रीही मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे . तेलकट त्वचेसाठी उन्हाळ्यात  अस्ट्रीनजन लावून त्यावर मॉइश्चरायझर क्रीम लावावी.

४.  थंडरिंग  :-
      थंडीत (हिवाळ्यात) तेलकट त्वचा असलेल्यांनी ही दिवसातून एकदा तरी क्रीम लावली पाहिजे. थंडीमध्ये महिन्यातून एकदा फेशिअल केले पाहिजे. उन्हाळ्यात  मॉइश्चरायझर क्रीम आणि फेशियल केले पाहिजे.
       कोरडी त्वचा असेल तर सकाळी क्रीम आणि हिवाळ्यात १५ - १५ दिवसात एकदातरी फेशियल केले पाहिजे.

५.  फेस पॅक  :-



      कोरडया स्किन साठी थंडीच्या महिन्यात पाच मिनिट फेस पॅक लावावे. पॅक मध्ये  ग्लिसरीन किंवा मद टाकावे. उन्हाळ्यात दहा मिनिटे चेहऱ्यावर पॅक लावावा.
       तेलकट त्वचेसाठी हिवाळ्याच्या महिन्यात दहा मिनिट पॅक चेहऱ्यावर लावावा. आणि उन्हाळ्यात पॅक मध्ये ज्यूस किंवा अस्ट्रीनजन मिक्स करून चेहऱ्यावर लावावे.नॉर्मल त्वचेसाठीही पॅक लावणे गरजेचे आहे.
     
     माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
     हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा.
      तुम्हाला त्वचा आणि केसा संदर्भात  काही माहिती हवी असेल तर फेसबुक वर माझा कुशल ब्युटी आणि हेअर केअर हा माझा ग्रुप जॉईन करा.
      फेसबुक ग्रुपची लिंक मी इथे दिली आहे.


टिप्पण्या

  1. खुपच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा

लोकप्रिय पोस्ट