५ महत्वाच्या ब्युटी टिप्स.

    ब्लॉग नंबर १.

     तुम्हाला माहित आहे का, चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी तुम्हाला दररोज कोणत्या महत्वाच्या गोष्टी करायला हव्यात ते, ज्यामुळे तुमचा चेहरा नितळ आणि तजेलदार दिसेल.

     जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी ह्या टिप्स नियमित केल्या तर तुमचा चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसेल.
     
     जाणुन घ्यायचे आहे का त्या कोणत्या महत्वाच्या टिप्स आहेत. तर हा ब्लॉग तुमच्यासाठी नक्की वाचा आणि जाणुन घ्या तुमच्या सौद्र्याचे गुपित.

५ महत्वाच्या ब्युटी टिप्स

१.  रोज भरपूर पाणी प्यावे.
२.  चांगला आहार घ्यावा.
३.  रोज व्यायाम करावा.
४.  चांगली झोप घ्यावी.
५.  रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवावा.

१.  रोज भरपूर पाणी प्यावे:-

    रोज दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे तुमच्या बॉडीतून टॉक्सींस बाहेर पडायला मदत होते. आणि तुमची त्वचा ही चांगली राहते.

२.  चांगला आहार घ्यावा :-

   
    योग्य आणि चांगला आहार घेतल्याने आपले आरोग्य चांगले राहते पण आपली त्वचा ही चांगली राहण्यास मदत होते. हल्लीच्या जीवनात बर्गर पिझा अशाप्रकारचे फास्टफुड तसेच ऑईल इतकं खाल्ले जाते, तसेच अति गोड खाल्याने ही आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होत असतो.

३.  रोज व्यायाम करावा:-

.          
         व्यायामामुळे आपल्या शरीरातील घाम बाहेर पडतो. घामावाटे आपल्या बॉडीतून उष्णता बाहेर पडते. आणि आपली त्वचाही नितळ आणि उजळ व्हायला मदत होते.

.

४.  चांगली झोप घ्यावी :-

   आपल्या शरीरासाठी पूर्ण झोप खूप महत्वाची आहे. आपल्या शरीरासाठी ८ तासाची झोप फार महत्वाची आहे. झोप पूर्ण झाली नाही तर आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात. आणि चेहऱ्यावर ही त्याचा ताण जाणवतो. म्हणून झोप खूप महत्वाची आहे.

५.  रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवावा :-

.           
          झोपायच्या आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. चेहऱ्यावर धूळ माती किवा मेकअप असतो तो झोपायच्या आधी काढून टाकला पाहिजे. त्या साठी आपल्या चेहऱ्यावर जोरात पाणी मारावे आणि चेहरा स्वच्छ धुवावा. जोरात पाणी मारल्याने चेहऱ्यावरील छिद्रांमधे जी घाण असते ती निघायला मदत होते.

      माझा हा ब्लॉग तुम्ही पुर्ण वाचलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद,
       माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील. तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. Like, comments आणि share करा.
        सौद्र्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर माझा फेसबुक ग्रुप kushal beauty and hair care हा माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.
        फेसबुक ग्रुपची लिंक इथे दिली आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा

लोकप्रिय पोस्ट